Entertainment

Malaika Arora Romance With Harsh Mehta In Rome: 19 वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली मलायका अरोरा, रोममध्ये रोमांन्स करतानाचा PHOTO व्हायरल?

February 22, 2026 2,127 views 1 min read
Malaika Arora Romance With Harsh Mehta In Rome: 19 वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली मलायका अरोरा, रोममध्ये रोमांन्स करतानाचा PHOTO व्हायरल?
Malaika Arora Romance With Dimond Businessman Harsh Mehta In Rome: बॉलिवूड (Bollyood News) दिवा मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) ब्रेकअप झाल्यानंतर तिचं नाव हिरे व्यापारी हर्ष मेहताशी (Harsh Mehta) जोडलं गेलेलं. मलायका आणि हर्षचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मलायका दिसली नव्या बॉयफ्रेंडच्या मिठीतसोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो एका रेडिट युजरनं शेअर केलाय. ज्यामध्ये दावा करण्यात आलेला की, मलायका आणि हर्षनं इटलीच्या रोममध्ये एकत्र व्हॅलेंटाईन डे साजरा केला. फोटोमध्ये हर्ष सेल्फी घेताना दिसतोय आणि मलायका त्याच्या मिठीत सामावल्याचं पाहायला मिळतंय. दोघे एकत्र खूप आनंदी दिसतायत. फोटो व्हायरल होताच, युजर्सनी पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला. View this post on Instagram A post shared by Karishma Patidar (@stylebykarishmaa)एका युजरनं लिहिलंय की, हा फोटो स्पष्टपणे पीआर फोटोसारखा दिसतोय, जणू कंपोज्ड केलाय. मलायका वर्षानुवर्ष तिच्या क्रिंज PR साठी ओळखली जाते. दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "काय मग वाटतंय ना, जसं स्टुडिओ लाईट्स यांच्याकडेच वळल्यात...? हे शूटसाठी आहे की प्रमोशनसाठी?" इतर युजर्सनी पोस्टवर कमेंट केलीय आणि विचारलंय की, ते खरोखरंच रिलेशनशिपमध्ये आहेत का?हर्ष मेहता आणि मलायकाच्या वयात अंतर किती? मलायका 52 वर्षांती आहे आणि हर्षचं वय 33 वर्ष आहे, त्यामुळे दोघांच्या वयातील अंतर थोडं थोडकं नाहीतर तब्बल 19 वर्षांचं आहे. अर्जुन कपूर आणि मलायका यांच्या वयातलं अंतर तब्बल 12 वर्षांचं होतं. अर्जुन मलायकाहून 12 वर्षांनी लहान होता. अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये असताना मलायका अनेकदा त्यांच्या नात्याबाबत उघडपणे बोलली होती. एवढंच काय तर दोघांनी आपले क्लोज फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका हिरे व्यापारी हर्ष मेहतासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. पण, मलायकानं हर्षबाबत अद्यार कोणतीही पोस्ट केलेली नाही. दरम्यान, अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतरही, मलायकाचा लग्नावरील विश्वास कमी झालेला नाही. काही दिवसांपूर्वीच्या एका मुलाखतीत तिनं म्हटलं होतं की, तिचा लग्नावर विश्वास आहे. "जर लग्न झालं तर ते चांगलं आहे. अन्यथा, मी ते करणार नाही..." तिनं ट्रोलर्सनाही उत्तर दिलेलं की, ती बाहेरील आवाजाचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ देत नाही.महत्त्वाच्या इतर बातम्या :Tejasswi Prakash Buys Apartment In Mumbai: मराठमोळ्या टेलिव्हिजन अभिनेत्रीनं मुंबईत खरेदी केलं दुसरं लक्झरी घर; कोट्यवधींच्या घराची किंमत ऐकून डोळेच फिरतील!